विविध उद्योग, व्यवसायासाठी परवानगी बंधनकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:48 AM2020-04-21T10:48:29+5:302020-04-21T10:48:49+5:30

उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले.

Permission bound for different industries, businesses! | विविध उद्योग, व्यवसायासाठी परवानगी बंधनकारक !

विविध उद्योग, व्यवसायासाठी परवानगी बंधनकारक !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात काही उद्योग-व्यवसायांना संचारबंदीतून शिथिलता देण्यात आली आहे. संबंधित उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले. याबाबतचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २० एप्रिल रोजी जारी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातही परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजनेत कक्ष स्थापन करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणी पुरवठा व इतर विभागांची बांधकामे यासाठी परवानगी देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मोटरपंप, अवजड यंत्र, पाणीपुरवठा करणारे पंप, यंत्र व कृषिसाठी लागणारे पंप व बॅटरी यांची दुकाने सुरु करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या १७ एप्रिलच्या अधिसूचनेत नमूद आवश्यक सेवांबाबतची दुकाने व आस्थापना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आवश्यक कामे आणि पांदण रस्ते यांची परवानगी प्रक्रिया संबंधित कार्यक्षेत्रातील तहसीलदार यांच्या अखत्यारीत पूर्ण केली जाईल. एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून, तर एमआयडीसी क्षेत्राबाहेरील उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्याकडून परवानगी देण्यात येईल. जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतुकीचे परवानगी देण्याचे अधिकार पोलीस विभागाकडे देण्यात आले आहेत. फरसाण, कन्फेक्शनरी इत्यादी सेवांबाबत संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी परवानगी देतील.


अशी राहणार दुकानांची वेळ
कृषि उत्पन्न बाजार समित्यांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठेवण्यात आली. कृषि सेवा केंद्रांचा कालावधी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. दुध संकलन केंद्र सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत व संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतील. बँकांची, एटीएमची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहील. वैद्यकीय सेवा २४ तास सुरु राहतील. याव्यतिरिक्त इतर सर्व परवानगी दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाºया आस्थापना, दुकाने यापूर्वी प्रमाणेच सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील. लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात संचारबंदी तसेच लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संचारबंदी आदेशाचा भंग झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Web Title: Permission bound for different industries, businesses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम