निर्बंधातून सूट दिलेल्या बाबींसाठी डिझेल, पेट्रोल उपलब्ध करून देण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:44 AM2021-05-11T04:44:04+5:302021-05-11T04:44:04+5:30

या आदेशानुसार कडक निर्बंध कालावधीत महसूल विभाग, डॉक्टर्स, विद्युत विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, नगरपालिका विभाग, पोलीस कर्मचारी, ...

Permission to make diesel and petrol available for exempted items | निर्बंधातून सूट दिलेल्या बाबींसाठी डिझेल, पेट्रोल उपलब्ध करून देण्यास मुभा

निर्बंधातून सूट दिलेल्या बाबींसाठी डिझेल, पेट्रोल उपलब्ध करून देण्यास मुभा

Next

या आदेशानुसार कडक निर्बंध कालावधीत महसूल विभाग, डॉक्टर्स, विद्युत विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, नगरपालिका विभाग, पोलीस कर्मचारी, बँक व पोस्ट कर्मचारी, कोषागार कार्यालयाचे कर्मचारी यांना पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल भरण्याकरिता मुभा राहणार आहे. तसेच दूध वितरक, मेडिकलधारक, भाजीपाला व फळविक्रेते, किराणा दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन केंद्रचालक, कृषी व गॅस एजन्सीधारक यांना घरपोच सेवेची मुभा देण्यात आली असल्याने पेट्रोलपंपांवरून पेट्रोल, डिझेल भरण्याकरिता मुभा राहील. मात्र, घरपोच सेवा देणाऱ्या व्यावसायिक, कामगार यांनी ओळखपत्र स्थानिक तहसीलदार यांच्याकडून प्राप्त करून सोबत बाळगणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील दवाखाने, आरोग्य यंत्रणेशी संबंधित आस्थापनांना जनरेटरसाठी तसेच नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या टँकर इत्यादींना आवश्यक पेट्रोल, डिझेल उपलब्ध करून देण्यास मुभा राहील. जिल्ह्यात सुरू असलेली रस्ते, महामार्गाची कामे व इतर शासकीय कामे सुरळीत सुरू ठेवण्याकरिता कंत्राटदारांकडे सदर कामासंबंधित असलेल्या वाहनांकरिता पेट्रोलपंपावरून पेट्रोल, डिझेल भरण्याकरिता मुभा राहील.

.......................

बाॅक्स :

पत्रकारांच्या वाहनांना मिळणार पेट्रोल

जिल्ह्यातील नोंदणीकृत पत्रकारांना पत्रकारितेकारिता त्यांच्या कार्यालयात जाण्याकरिता मुभा देण्यात आली आहे. परंतु, संबंधित पत्रकार यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. याशिवाय पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याकरिता पत्रकारांना सूट देण्यात येत आहे, त्यांनी पेट्रोल भरताना ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

....................

आदेशाचा भंग झाल्यास कारवाई

या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंडसंहिता १८६०च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

Web Title: Permission to make diesel and petrol available for exempted items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.