मेमन समाजातील दानशूरांनी गरिबांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा- हाजी इकबाल मेमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:03+5:302021-01-25T04:41:03+5:30
मानोरा येथील रहेमानिया कॉलनीत मेमन समाजातील ६ गरीब गरजू लोकांसाठी मानोरा मेमन जमातकडून मेमन टाॅवर या निवासी इमारतीची उभारणी ...
मानोरा येथील रहेमानिया कॉलनीत मेमन समाजातील ६ गरीब गरजू लोकांसाठी मानोरा मेमन जमातकडून मेमन टाॅवर या निवासी इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. यावेळी हाफिज मनसब शाह यांनी कुराणचे पठन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मेमन समाजाचे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफिसर, तर उद्घाटक म्हणून विदर्भ मेमन जमातचे अध्यक्ष हाजी बिलाल ठेकिया, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अ. अजीज मच्छीवाला, गुलाम मोहम्मद मिठू, शाकीर बाटलीवाला, रज्जाक लंघा, मो. हारुन सुपारीवाला, मो. सलीम आकबानी, अ. रऊफ टिक्की, मो. अनिस जानवानी, मो. युसूफ सलाट, मो. सलीम सुमार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन मानोरा मेमन जमात अध्यक्ष रऊफ लंघा यांनी केले. सूत्रसंचालन कादर डोसानी यांनी केले. यशस्वीतेसाठी मानोरा मेमन जमात अध्यक्ष अ. रऊफ लंघा, अ. गणी, मो. इद्रिस लंघा, मो. अमिन विच्छी, जाकीर लंघा, मो. अशफाक पोपटे, अ. करीम लंघा, अ. मजीद डब्बावाला, मो. अलताफ लंघा, मो. साजीद डब्बावाला, मो. इम्तियाज सरमतिया यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी शहर व परिसरातील मेमन समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.