कारंजा शहर पोलीस स्टेशनचा फोन चार दिवसापासून बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:31 PM2017-11-20T16:31:58+5:302017-11-20T16:32:24+5:30

कारंजा लाड  : शहरात कोणतीही घटना असो वा अपघात या घटनेची माहीती पोलीसांना त्वरीत व्हावी हेतूने शहर पोलीस स्टेशनला असलेला लॅन्डलाईन फोन गेल्या चार दिवसापासून बंद असल्याने पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधणा-यांना नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

The phone of the city police station of Karanja was closed for four days | कारंजा शहर पोलीस स्टेशनचा फोन चार दिवसापासून बंद 

कारंजा शहर पोलीस स्टेशनचा फोन चार दिवसापासून बंद 

Next
ठळक मुद्दे पोलीसासोबत संपर्क साधणे कठीन जात आहे

कारंजा लाड  : शहरात कोणतीही घटना असो वा अपघात या घटनेची माहीती पोलीसांना त्वरीत व्हावी हेतूने शहर पोलीस स्टेशनला असलेला लॅन्डलाईन फोन गेल्या चार दिवसापासून बंद असल्याने पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधणा-यांना नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कडे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी लक्ष दयावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

पोलीस स्टेशनचा असलेला २२२१०० क्रमांक म्हणजे महीला व नागरिकांना सुरक्षा मिळविण्यासाठी असलेली हेल्पलाईन आहे. याकडे दुर्लक्षकरून चालणार नाही, कारण यामुळे शहरात चोरी तसेच चिडीमारीच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस स्टेशनचा असलेला संपर्क नंबर १०० असल्यामुळे सर्वाच्याच पाठ आहे. त्यामुळे शहरात अथवा ईतर ठिकाणी कोणतेही घटना घडो पोलीसोबत संपर्क साधणे सोपे जाते. मात्र गेल्या चार दिवसापासून असलेल्या १०० क्रमांकाचा लॅन्डलाईन बंद असल्याने पोलीसासोबत संपर्क साधणे कठीन जात आहे. शहराची पाश्र्वभुमी लक्षात घेता बंद असलेला टेलीफोन त्वरीतच सुरू व्हायला पाहीजे होता. मात्र याकडे संबधित पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने हा फोन बंद राहत असल्याचे निर्देशनास येते. पोलीसांचाच फोन बंद आहे तर तक्रार कुठे करणार हाही प्रश्न सामान्य नागरीकांकडून व्यक्त होत आहे. या संदर्भात वरीष्ठ अधिक ाºयांना या बाबत माहीती दिली तरी सुध्दा फोन सुरू झाला नाही. या गंभीर समस्येकडे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. 

Web Title: The phone of the city police station of Karanja was closed for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.