१९ हजार मतदारांची छायाचित्रे अद्याप अप्राप्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:34+5:302021-07-03T04:25:34+5:30
जिल्ह्यात कारंजा-मानोरा, मंगरूळपीर-वाशिम आणि रिसोड-मालेगाव, असे तीन मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात मतदान ओळखपत्रात छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून त्यांची नजीकच्या ...
जिल्ह्यात कारंजा-मानोरा, मंगरूळपीर-वाशिम आणि रिसोड-मालेगाव, असे तीन मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात मतदान ओळखपत्रात छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून त्यांची नजीकच्या काळातील छायाचित्रे संकलित करण्याची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत १९ हजारांहून अधिक व्यक्तींकडून छायाचित्रे प्राप्त होऊ शकली नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून ७ नंबरचा अर्ज भरून घेण्यात आला असून, त्यांची नावे मतदार यादीतून आता वगळली जाणार आहेत.
------------
बॉक्स- छायाचित्र गोळा करण्याचे काम सुरू
जिल्ह्यातील वाशिम-मंगरूळपीर, कारंजा-मानोरा आणि रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघात छायाचित्र गोळा करण्याचे काम निवडणूक विभागाकडून केले जात आहे. गत आठवडाभरात या अंतर्गत ४९४ जणांचे छायाचित्र अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण केले आहे. आतापर्यंत छायाचित्र न दिल्यामुळे १० हजार ८३८ मतदारांचे नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता असून, शासनाची जशी सूचना येईल, त्याप्रमाणे निवडणूक विभाग काम करीत आहे. मतदारांनी आपले छायाचित्र केंद्राधिकाऱ्यांकडे नेऊन द्यावे, असेही निवडणूक विभागाने सांगितले.
----------------
बॉक्स: येथे जमा करा छायाचित्र
१)मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात ओळखपत्रात छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून बीएलओमार्फत छायाचित्र गोळा करण्याचे काम केले जात आहे.
२) बीएलओ घरोघरी फिरून मतदारांची छायाचित्रे गोळा करण्यासह इतर माहिती घेत आहेत.
३) मतदारांना संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात कर्मचाऱ्यांकडे आपले छायाचित्र जमा करून मतदान ओळखपत्र अद्ययावत करता येऊ शकते.
---------
बॉक्स: छायाचित्र नसलेले मतदार
विधानसभा - एकूण मतदार - वगळलेले मतदार
१)३३-रिसोड -३०५८२८ - ६८६९
२) ३४-वाशिम -३३७३२५ - ९९९७
३) ३५-कारंजा -२९९६१८ - २७११
--------
१) जिल्ह्यातील एकूण मतदार - ९४२७७१
२) जिल्ह्यातील स्त्री मतदार- ४४८४७४
३) जिल्ह्यातील पुरुष मतदार -४९४२९१
४) छायाचित्र न दिलेले मतदार -१९५७७
५) छायाचित्र न दिलेले स्त्री मतदार -७१८८
६) छायाचित्र न दिलेले पुरुष मतदार - १२३८९
विधानसभा - एकूण मतदार -छायाचित्र नसलेले मतदार
वाशिम -
कोट: छायाचित्र अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम नियमित राबविला जातो. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात नजीकच्या कालवधीत काढले असलेले आपले रंगीत छायाचित्र जमा करावे. तसेच मतदार यादी शुद्धीकरणकामी मतदारांनी निवडणूक विभागाच्या केंद्राधिकारी यांना सहकार्य करावे.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम