मतदारांची छायाचित्रे अद्याप अप्राप्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:15+5:302021-07-15T04:28:15+5:30

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित वाशिम : मालेगाव तालुक्यात मेडशीसह इतर काही ठिकाणी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३५ पेक्षा अधिक ...

Photographs of voters are still unavailable | मतदारांची छायाचित्रे अद्याप अप्राप्तच

मतदारांची छायाचित्रे अद्याप अप्राप्तच

Next

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित

वाशिम : मालेगाव तालुक्यात मेडशीसह इतर काही ठिकाणी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३५ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

वाशिम : गतवर्षी अवकाळी पावसामुळे पांगरी, राजुरा परिसरात फळबागेसह पिकांचे नुकसान झाले होते. कृषी विभागातर्फे नुकसानग्रस्त भागाची पाहणीही करण्यात आली; परंतु अद्याप भरपाई मिळालेली नाही.

पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान

वाशिम : कारंजा तालुक्यातील धामणी खडी परिसरात आलेल्या अवकाळी पावसामुळे फळपिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हताश झाला आहे.

रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय

वाशिम : रिसोड तालुक्यातील महागाव ते रत्नापूर मारमाळ पाणंद रस्ता नाही. तसेच महागाव ते सोनाटी शिवेपर्यंत खडीकरण नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

Web Title: Photographs of voters are still unavailable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.