रिसोड बसस्थानकात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 10:45 AM2020-12-11T10:45:22+5:302020-12-11T10:47:42+5:30
Risod News प्रवाशांनी मास्कचा वापर केला नाही तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही केले नाही.
रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येते. तथापि, याकडे प्रवाशांचे दुर्लक्ष होत असल्याचे गुरूवार, १० डिसेंबर रोजी दिसून आले.
अनलॉकच्या टप्प्यात महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशी वाहतूक सुरू झाली. दिवाळीदरम्यान रिसोड येथील बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. या दरम्यान अनेकांनी मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. दिवाळीनंतरही रिसोड बसस्थानकात प्रवाशांची गर्दी कायम आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांनीदेखील मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन तालुका प्रशासन, आरोग्य विभागासह महामंडळाच्या रिसोड आगार प्रमुखांकडून वारंवार करण्यात येते. तथापि, याकडे प्रवाशी व नागरिकांची दुर्लक्ष होत आहे. गुरूवारी रिसोड येथील बसस्थानकामध्ये अनेक प्रवाशांनी मास्कचा वापर केला नाही तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही केले नसल्याचे दिसून आले.