पिंप्री खु. येथे होणार पाच हजार वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:42 AM2021-03-31T04:42:00+5:302021-03-31T04:42:00+5:30
समृद्ध गाव स्पर्धेच्या कामांना सुरुवात झाली आहे. या गावात प्राथमिक स्तरावर सीसीटीसह वृक्ष लागवडीला सुरुवात झाली असून, सर्व गावांत ...
समृद्ध गाव स्पर्धेच्या कामांना सुरुवात झाली आहे. या गावात प्राथमिक स्तरावर सीसीटीसह वृक्ष लागवडीला सुरुवात झाली असून, सर्व गावांत वृक्ष लागवडीचे नियोजन केले जात आहे. या अंतर्गत मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री खु. या गावात पाच हजार वृक्षांची लागवड सामाजिक वनीकरण विभागाने प्रस्तावित केली आहे. यासाठी सोमवारी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लागवड अधिकाऱ्यांनी पिंप्री खु. येथे भेट देऊन जागेची पाहणी केली. दरम्यान, पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेदरम्यान पिंप्री खु. येथे ३२०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, या वृक्षांची पाहणीही वनपरिक्षेत्र अधिकारी व लागवड अधिकाऱ्यांनी केली. या वृक्षांची देखरेख करण्यासाठी ८ मजूरही लावण्यात आले आहेत. जलमित्र गोपाल सुर्वे यांनी या वृक्षांना पाणी घालण्यासाठी त्यांच्या शेतामधून वृक्षांपर्यंत पाइपलाइन टाकून दिली आहे.