रिसोड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ‘लिकेज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 03:17 PM2019-01-04T15:17:59+5:302019-01-04T15:18:05+5:30
शिरपुर जैन: अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पार्डी तिखे येथे 'लिकेज' झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.
शिरपुर जैन: अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पार्डी तिखे येथे 'लिकेज' झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.
मालेगाव तालुक्यातील शिरपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी रिसोड नगरपरिषदेची स्वतंत्र पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन जुलै महिन्यात लिकेज झाली होती. त्यावेळीही दररोज हजारो लिटर पाणी वाया गेले. तेव्हा लोकमतने वृत्त प्रकाशित करून रिसोड नगरपरिषदचे लक्ष वेधले होते. त्यानंतर रिसोड नगर परिषदने दुरुस्तीचे काम केल्याचे ऐकावयास मिळत होते परंतु त्यावेळी हे लिकेज काढण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून पार्डी तिखे येथे पुन्हा रिसोड नगरपरिषदेची पाईपलाईन लिकेज झालेली दिसून येत आहे परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. या लिकेजमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या लिकेजमुळे पार्डी तिखे येथील शेतकरी माधव भिवाजी तिखे यांच्या शेतातील हरभरा पिकाचेही नुकसान े झाले आहे. याविषयी रिसोड नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांना नोव्हेंबर महिन्यात भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी रिसोड नगर परिषदेची निवडणूक सुरू असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर पाईपलाईन दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले असल्याचे बोलल्या जाते. मात्र अद्यापही सदर पाईपलाईन दुरुस्त न केल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यावर्षी पावसाळ्यात अडोळ प्रकल्प १०० टकके भरला असल्याने अजूनही प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. रिसोडसह शिरपूर व रिठद या गावाला सुद्धा अडोळ प्रकल्पातूनच पाणीपुरवठा केला जातो. मात्र लिकेज पाईपलाईनमुळे वाया जाणाºया पाण्याला रोखण्यासाठी कोणीही पुढाकार घेतांना दिसून येत नाही.