पाईपलाईन अद्याप नादुरूस्त !

By admin | Published: May 17, 2017 07:35 PM2017-05-17T19:35:03+5:302017-05-17T19:35:03+5:30

राजूरा (वाशिम) : रिधोरा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली नसल्याने गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Pipeline still bad! | पाईपलाईन अद्याप नादुरूस्त !

पाईपलाईन अद्याप नादुरूस्त !

Next

राजूरा (वाशिम) : जिल्हा विकास योजना या शिर्षाअंतर्गत करण्यात आलेल्या रिधोरा ते गोकसावंगी या रस्ता कामादरम्यान रिधोरा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईनची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नसल्याने गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

रिधोरा ते गोकसावंगी या रस्त्याचे सुरुवातीचे एक किमी काम करीत असताना रिधोरा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची तोडफोड झाली. सदरहू पाईपलाईन दुरुस्ती करण्याबाबत कंत्राटदाराने लेखीपत्र तपास अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत प्रशासनाला दिले होते. त्याला १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला. मात्र, दुुरुस्तीचे काम झाले नाही परिणामी ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

रस्ता दुरुस्तीचे काम करीत असताना कंत्राटदाराने नियमानुसा रस्त्यावर गिट्टी व मुरुम टाकलेला नाही. शिवाय कामाची पाणी टाकून दबाई करण्यात आलेली नाही, असा आरोप भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष संदीप सावळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे केला. या रस्ता कामासाठी वापरलेल्या गौण खनिजाच्या रॉयल्टीची रक्कम महसूल विभागाकडे जमा करण्यात आलेली नाही. अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आलेले गौणखनिज व प्रत्यक्ष वापरण्यात आलेल्या गौणखनिजाच्या ब्रासमध्ये मोठया प्रमाणात तफावत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी सावळे यांनी केली.

दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मालेगाव येथील उपअभियंता व्ही.व्ही. आपोतीकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की पाईपलाईन तोडफोडीची दुरूस्ती करून देण्याची ग्वाही संबंधित कंत्राटदाराने लेखी स्वरुपात दिलेली आहे.

Web Title: Pipeline still bad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.