शिरपूर पोलीस स्टेशन प्रवेशव्दारावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:44+5:302021-09-03T04:43:44+5:30
शिरपूर जैन या गावाला पर्यटन क्षेत्राचा ब दर्जा प्राप्त आहे. मात्र येथील सर्वच मुख्य रस्त्यांची मागील सात-आठ वर्षांपासून ...
शिरपूर जैन या गावाला पर्यटन क्षेत्राचा ब दर्जा प्राप्त आहे. मात्र येथील सर्वच मुख्य रस्त्यांची मागील सात-आठ वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्याचे दुरुस्तीचे कुठलेही काम होताना दिसत नाही. येथील जानगीर महाराज संस्थानकडे जाणारा रस्ता, जैन मंदिरकडे जाणाऱ्या या रस्त्यांची, तर सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. त्यातच बसस्थानक ते पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामतः प्रवेशद्वारासमोर रस्त्यामध्ये पाणी जमा होत आहे. त्यामुळे प्रवेशद्वारात नेहमीच चिखल निर्माण होत आहे. याचा जाणारा - येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यटन क्षेत्राचा ब दर्जा असलेल्या गावातील मुख्य रस्त्याची दुरवस्थेबद्दल शिरपूर येथील रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या विकासकामासाठी तीर्थक्षेत्र अंतर्गत मोठा निधी उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे हेसुद्धा तेवढेच गरजेचे आहे.