कुटुंबाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’अंतर्गत नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:26 AM2021-07-22T04:26:01+5:302021-07-22T04:26:01+5:30

वाशिम : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ (सीएफपी) राबविला जात ...

Plan under the ‘Cluster Facilitation Project’ to increase family income | कुटुंबाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’अंतर्गत नियोजन करा

कुटुंबाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’अंतर्गत नियोजन करा

Next

वाशिम : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ (सीएफपी) राबविला जात आहे. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘सीएफपी’च्या माध्यमातून गावनिहाय सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात २१ जुलै रोजी आयोजित ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’विषयक बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयो उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांच्यासह सीएफपी चमूचे सदस्य उपस्थित होते.

नंद कुमार म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला व पाहिजे ते काम उपलब्ध करून देण्याबाबत ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’च्या माध्यमातून प्रयत्न करावेत. याकरिता वैयक्तिक अथवा सामूहिक लाभाची कामे करून ग्रामस्थांचे उत्पन्न कसे वाढविता येईल, याविषयी गावकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही नंद कुमार यांनी दिल्या.

००००

गावाचे समृद्धी बजेट तयार करावे

‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकसहभाग यांची सांगड घालून काम करावे लागेल. याची सुरुवात गावनिहाय आराखडा तयार करण्यापासून करावी. सुरुवातीला जिल्ह्यातील पिछाडीवर असलेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करावे. रोहयोअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे योग्य नियोजन करून गावाचे समृद्धी बजेट तयार करावे. प्रत्येक गावासाठी सूक्ष्म नियोजन करून ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ची अंमलबजावणी करावी, अशा सूचना नंद कुमार यांनी दिल्या.

Web Title: Plan under the ‘Cluster Facilitation Project’ to increase family income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.