पोहरादेवी यात्रेसाठी ‘एसटी’चे नियोजन

By admin | Published: March 30, 2017 02:37 AM2017-03-30T02:37:18+5:302017-03-30T02:47:22+5:30

२५ अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याची मंगरु ळपीर आगारप्रमुखांनी दिली माहिती.

Planning of 'ST' for the yatra for the Poharadevi | पोहरादेवी यात्रेसाठी ‘एसटी’चे नियोजन

पोहरादेवी यात्रेसाठी ‘एसटी’चे नियोजन

Next

वाशिम, दि. २९- बंजारा काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे श्रीरामनवमी आणि सेवालाल महाराजांच्या यात्रेनिमित्त देशभरातील बंजारा भाविकांची मोठी गर्दी होते. या यात्रेत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अकोला परिमंडळाच्यावतीने या यात्रेसाठी २५ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या मंगरुळपीर आगारप्रमुखांकडून बुधवारी देण्यात आली.
बंजारा बांधवांची काशी म्हणून ख्यात असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे श्रीरामनवमी यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. बंजारा समाज हा देश-विदेशात विखुरलेला समाज असून, प्रांतानुसार समाजाच्या पेहरावात काही बदल असले, तरी हा संपूर्ण समाज संत सेवालाल महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो. त्यामुळेच देशाच्या कानाकोपर्‍यात स्थायिक झालेले बंजारा बांधव संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहरादेवी येथे येत असतात. सतत आठवडाभर ही यात्रा सुरू राहते.

Web Title: Planning of 'ST' for the yatra for the Poharadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.