तूर साठवणुकीसाठी नियोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:12 AM2017-08-09T02:12:41+5:302017-08-09T02:13:18+5:30
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत टोकनधारक शेतकर्यांकडून खरेदी करण्यात येत असलेली तूर साठविण्याची अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने वखार महामंडळाच्या सहकार्याने खासगी गोदामांचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एक लाख क्विंटल क्षमतेचे खासगी गोदाम भाड्याने घेण्यात आले असून,आणखी दीड लाख क्विंटल साठवण क्षमतेचे गोदाम भाड्याने घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत टोकनधारक शेतकर्यांकडून खरेदी करण्यात येत असलेली तूर साठविण्याची अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने वखार महामंडळाच्या सहकार्याने खासगी गोदामांचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एक लाख क्विंटल क्षमतेचे खासगी गोदाम भाड्याने घेण्यात आले असून,आणखी दीड लाख क्विंटल साठवण क्षमतेचे गोदाम भाड्याने घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गतव तुरीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले. अशीच स्थिती राज्यभरात होती; परंतु शेतकर्यांना सुरुवातीला अपेक्षीत भाव मिळत नसल्याच्या तक्रारी होत असल्याने शासनाने फे ब्रुवारी २0१७ पासून सुरुवातीला केंद्रशासनाच्या, तर त्यानंतर राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली. ३१ मे २0१७ पर्यंत चाललेल्या या खरेदीत वेळोवेळी विविध कारणांमुळे अडचणी आल्याने टोकन घेतलेल्या हजारो शेतकर्यांच्या तुरीची मोजणी होऊ शकली नव्हती. अशा टोकणधारक शेतकर्यांच्या तुरीची पडताळणी करून ती बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ३१ ऑगस्टपर्यंत मोजून घेण्याचे शासनाने निश्चित केले. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात विविध केंद्रांवरील मिळून १४ हजार ५४२ शेतकर्यांची तब्बल २ लाख ८४ हजार क्विंटल तूर मोजणे बाकी होते. त्या सर्व शेतकर्यांची तूरू २७ जुलैपासून मोजून घेण्यास सुरुवात झाली. ही तूर मोजून घेताना बारदाणा किंवा साठवुणकीच्या अडचणीमुळे खरेदी बंद पडू नये म्हणून साठवण आणि बारदाण्याची जिल्हास्तरावरच नियोजन करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. तथापि, जिल्ह्यात तूर खरेदी सुरू झाली. त्यावेळी वखार महामंडळाच्या गोदामांत अतिशय कमी जागा शिल्लक होती.
त्यामुळे खरेदी बंद पडू नये यासाठी जिल्हा उपनिबंधक, तसेच शासकीय खरेदीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून अडीच लाख क्विंटल साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात तूर खरेदीसाठी गोदामांचे नियोजन करण्यात आले असून, सद्यस्थितीत एक लाख क्विंटल साठवणूक क्षमता असलेले एक खासगी गोदाम वाशिम येथे भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. जिल्हाभरातील पाच शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आलेली तूर वाशिम येथील गोदामांत साठविण्यात येत आहे.
त्याशिवाय दीड लाख क्विंटल साठवणूक क्षमतेचे गोदाम भाड्याने घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, येत्या चार ते पाच दिवसांतच हे गोदामही तूर साठवणुकीसाठी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक बी.एच. भाकरे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले.
५0 हजार क्विंटल तुरीची मोजणी
जिल्ह्यात टोकनधारक शेतकर्यांची तूर मोजून घेण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर ७ जुलैपर्यंत जवळपास ५0 हजार क्विंटल तुरीची मोजणी करण्यात आली असून, अद्यापही २ लाख ३0 हजार क्विंटल तुरीची मोजणी बाकी आहे. ही तूर येत्या १५ दिवसांत मोजली जाण्याचा विश्वास संबंधित अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकार्यांनी तुरीची मोजणी संथगतीने होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून तूर मोजणीला वेग देण्याच्या सूचना ६ ऑगस्ट रोजी दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी सर्वच तालुका सहाय्यक निबंधक आणि बाजार समित्यांसह संबंधित यंत्रणेला पत्र पाठवून जिल्हाधिकार्यांच्या सुचनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार तूर मोजणीला वेगही आला आहे.
सद्यस्थितीत तूर साठवणुकीसाठी १ लाख क्विंटल साठवण क्षमतेचे खासगी गोदाम भाड्याने घेण्यात आले आहे. त्याशिवाय दीड लाख क्विंटल साठवण क्षमतेच्या गोदामासाठी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांकडे प्रस्तावही पाठविण्यात आलेला असून, येत्या चार पाच दिवसांतच त्याबाबत निर्णय होऊन गोदाम उपलब्ध होईल.
-बी. एच. भाकरे, जिल्हा व्यवस्थापक