वाशिम जिल्ह्यात श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या ग्रामस्थांनी केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:54 PM2018-07-29T13:54:23+5:302018-07-29T13:56:07+5:30
वाशिम: यंदा पार पडलेल्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांनी २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदा पार पडलेल्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांनी २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड केली. यात कारंजा तालुक्यातील ग्रामस्थांचाही सहभाग होता. या वृक्ष लागवडीसाठी स्पर्धेदरम्यान तयार केलेल्या रोपवाटिकेतील रोपांचाच वापर करण्यात आला.
पाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदा राज्यातील विविध तालुक्यांत राबविण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार २८ जुलै रोजी सकाळीच वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत या मोेहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहिम २९ जुलै रोजी पार पडली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा या दोन तालुक्यांचा यंदाच्या वॉटर कप स्पर्धे समावेश होता. त्यापैकी कारंजा तालुक्यातील पोहा, बेलमंडळ, काकडशिवनी, विळेगाव, बांबर्डा, पिंपळगांव बु, पिंप्रिमोडक, धनज बु, आदि गावांत वृक्षारोपण करण्यात आले. पोहा येथे सरपंच डॉ. शरद दहातोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेमधे करण्यात आलेल्या श्रमदानातून केलेल्या कामाच्या परिसरात वृक्षारोपण केले. बेलमंडळ येथे सरपंच सचिन एकनार यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात शिक्षक व विद्यर्थ्यांना सोबत घेऊन वृक्षारोपण केले, तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतकडून वृक्षमित्रचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याचे ठरविले, काकड शिवणी येथे सरपंच संगीता चक्रनारायण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाव शिवारात वृक्षारोपण केले. विळेगाव येथे गावाचे ग्रामसेवक जितेंन्द्र वडते, राजू घुले, नंदा खंङारे, रवि घुले, गिता रामटेके व गावकऱ्यांनी मिळून वृक्षारोपण केल. धनज बु, येथे सरपंच मोटलानी व ग्रामसेवकांनी वृक्षारोपण केले. पिंप्रीमोडक येथ सरपंच ललिता थोटांगे व बचतगट महिला मंडळाने वृक्षारोपण केले. पिंपळगांव येथे सरपंच दादाराव बहुटे व प्रशिक्षणार्थी यांनी वृक्षारोपण केले, तसेच बांबर्डा येथे सरपंच कांचन भेंडे व गावकऱ्यांनी वृक्षारोपण केले. पाणी फाऊंंडेशन कडून राबविन्यात आलेल्या वॉटर कपस्पर्धेमुळे गाव पाणीदार होण्यासह पर्यावरणात वृद्धी होण्यासह मदत होत आहे.