शेतजमीन आणि बांधावर रोजगार हमीतून वृक्षलागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:26 PM2018-04-25T17:26:05+5:302018-04-25T17:26:05+5:30

  वाशिम : विशिष्ट प्रवर्गातील शेतकºयांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

plantation on farmland through MREGS | शेतजमीन आणि बांधावर रोजगार हमीतून वृक्षलागवड!

शेतजमीन आणि बांधावर रोजगार हमीतून वृक्षलागवड!

Next
ठळक मुद्दे सामाजिक वनीकरण शाखेमार्फत त्याची अंमलबजावणी होईल, असे रोजगार हमी योजना विभागाकडून सांगण्यात आले.रोजगार हमी योजनेतील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

 
वाशिम : विशिष्ट प्रवर्गातील शेतकºयांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सामाजिक वनीकरण शाखेमार्फत त्याची अंमलबजावणी होईल, असे रोजगार हमी योजना विभागाकडून सांगण्यात आले.
अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, स्त्री -कर्ता असलेली कुटुंब, शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेली व्यक्ती, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ चे लाभार्थी यांना या योजनेचा  लाभ दिला जाईल. या प्रवर्गातील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर २००८ च्या कृषी कर्जमाफी व कर्ज सहाय योजनेत व्याख्या केलेल्या लहान तसेच सीमांत भूधारक शेतकºयांच्या जमिनीवरील कामांच्या व शर्तीच्या अधीन राहून या योजनेत प्राधान्य दिले जाईल.
दरम्यान, योजनेतील लाभार्थी जॉबकार्डधारक असणे आवश्यक असल्याने त्यांना स्वत:च्या क्षेत्रात केलेल्या वृक्ष लागवडीचे संवर्धन व जोपासना करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. वृक्षनिहाय मापदंडानुसार दुसºया व तिसºया वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे कामे  करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहणार आहे. या कार्यक्रमासाठी उपविभागाचे अधिकारी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार व प्रकल्प निरीक्षण समिती नेमण्यात येणार असून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

Web Title: plantation on farmland through MREGS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.