नागपूर- औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्डयांमध्ये वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:50 PM2018-08-17T13:50:54+5:302018-08-17T13:51:39+5:30
शेलुबाजार : शेलुबाजार चौकातून नागपूर- औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्डयांसंदर्भात संबधितांना वारंवार कळवूनही लक्ष दिल्या जात नसल्याने शिवसेनेच्यावतिने १७ आॅगस्ट रोजी या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

शेलुबाजार चौकातून गेलेल्या नागपुर औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्यात शिवसेना उपतालुका प्रमुख सतिष सावके यांनी संबंधित विभागाचे खड्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वृक्षारोपन केले. नागपुर- औरंगाबाद दृतगती मार्गावरील शेलूबाजार व लाठी गावानजीक जिवघेणी खड्डे पडले असुन वाहनधारक कमालीचे वैतागले आहे. स्थानीक चौकात पडलेल्या खड्यावरुन १६ रोजी पुराचे पाणी वाहत होते . त्यावेळी या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाºया वाहनधारकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडल्यात. यापूर्वीही या खड्डयांमुळे अनेक अपघात झाले आहेत. या खड्याकडे संबधीत विभागाचे लक्ष वेधून घेण्याकरिता सतिष सावके यांच्या मार्गदर्शनात खड्डयात वृक्षारोपण करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती लाभली होती.