तपोवन येथे २२ हजार वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:26 AM2021-07-19T04:26:01+5:302021-07-19T04:26:01+5:30
मंगरुळपीर सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी तपोवन गावांत वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला. यासाठी तपोवन शिवारातील ...
मंगरुळपीर सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी तपोवन गावांत वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला. यासाठी तपोवन शिवारातील ई-क्लास जमिनीवर२२ हेक्टर क्षेत्रात १० चौरस फूट आकाराचे २२ हजार खड्डे खोदण्यात आले. या खड्ड्यांत २२ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवड केलेल्या भागांत गुरांचा संचार होऊ नये म्हणून मोठमोठे चरही खोदण्यात आले आहेत. ही कामे सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर चौधरी यांच्या देखरेखीत सामाजिक वनीकरण सहायक लागवड अधिकारी अब्दुल अकिल यांनी वृक्ष लागवडीची भूमिका पार पाडली. या वृक्ष लागवडीसाठी तपोवन येथील सरपंच शरद येवले, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
---------
पाणी अडविण्यासाठी समतल चर
तपोवन येथे समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत विविध जलसंधारणाची आणि पर्यावरण संवर्धनाची कामे केली जात आहेत. त्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने २२ हजार वृक्षांची लागवड करतानाच ई-क्लास जमिनीवर पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी समतल चर खोदण्यात आली आहे. ग्रामस्थांनी श्रमदान करून हे समतल चर खोदले आहेत.