मालेगाव वन परीक्षेत्रातंर्गत होणार ६ लाख वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 03:11 PM2019-06-24T15:11:49+5:302019-06-24T15:11:59+5:30
मेडशी : मेडशी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मालेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत ६ लक्ष तिन हजार सहाशे तिस वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी : मेडशी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मालेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत ६ लक्ष तिन हजार सहाशे तिस वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाधमारे यांनी दिली.
वृक्ष लागवड व संगोपन कायक्रमाचे नियोजन अंमलबजावणी आणि संनियत्रणाबाबत तालुकास्तरावर आमदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश शासनस्तरावरून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मालेगाव वनपरिक्षेत्रात २९ जुन रोजी आमदार अमित झनक यांच्याहस्ते वृक्ष दिंडीला हिरवी झेंडी देऊन १ जुलैपासुन ३३ कोटी वृक्षलागवडीला सुरुवात होईल. आमदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाºया समितीत वृक्ष लागवड व संगोपन कायक्रमाचे नियोजन, अंमलजावणी आणि संनियंत्रणाबाबत सहअध्यक्ष तहसीलदार गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, प्रासकीय विभागाचे तालुकास्तरावरील अधिकारी वृक्ष लागवड व संगोपन आणि पर्यायवरण क्षेत्रात काम करणाºया अशासकीय संस्थेचे दोन पदाधिकारी वृक्ष लागवड संगोेपन आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया दोन सन्माननीय व्यक्ती, हरित सेनेमधील नोंदणीकृत दोन सदस्य आमदारांंच्या सहमतीनुसार अन्य अत्यावश्यक अधिकारी किवा व्यक्ती आमंत्रित सदस्य तर सदस्य सचिव वनपरिक्षत्र अधिकारी राहणार आहे. या समितीच्या स्थापनेनंतर १ जुलै रोजी वृक्षदिंडीला आमदार अमित झनक याच्याहस्ते हिरवी झेंडी दिली जाणार आहे. मेडशी कार्यालयांतर्गत येणाºया मालेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत ६ लाख ३ हजार ६३० वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाधमारे यांनी दिली. वन महोत्सवांतर्गत १ जुलै ते ३१ जुलै पर्यत ज्या खाजगी वृक्ष पे्रमींना वृक्ष लागवड करावयाची आहे. त्यांच्यासाठी वनविभागाकडून मालगाव तहसील मेडशी वनपरिक्षेत्र कार्यालय येथे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.