बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:10+5:302021-09-03T04:44:10+5:30

वाशिम : पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे सुरू आहेत. या ग्रामपंचायतीत आता बिहार पॅटर्नच्या धर्तीवर ...

Planting of lakhs of trees on the pattern of Bihar pattern | बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड

बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड

googlenewsNext

वाशिम : पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे सुरू आहेत. या ग्रामपंचायतीत आता बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यासंदर्भातील निर्देश जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगरूळपीर आणि कारंजाच्या गटविकास अधिकाऱ्यांना ३० ऑगस्ट रोजी दिले आहेत.

जिल्ह्यात पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कारंजा आणि मंगरूळपीर या दोन तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे केली जात आहेत. यात जलसंधारण, मृदसंधारणासह, वृक्षलागवड या प्रमुख कामांचा समावेश आहे. यातील बहुतांश कामे लोकसहभागातून केली जात असली तरी काही कामे प्रशासनाच्या सहकार्यातूनही केली जात आहेत. आता पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी ४३ ग्रामपंचायतींत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षलागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन गावकऱ्यांकडून केले जाणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षरोपे उपलब्ध केली जाणार आहेत.

---------------

या गावांत होणार वृक्षलागवड

कारंजा तालुका (२४) : जानोरी, विळेगाव, अंतरखेडा, जामठी, बेलमंडळ, पोहा, उंबर्डा बाजार, काकड शिवणी, शिवनगर, दोनद, गायवळ, नारेगाव, बेलमंडळ, शेलूवाडा, धोत्रा देशमुख, धोत्रा जहाँगीर, शिवण, पिंपळगाव, बांबर्डा, बेलखेडा, शहादतपूर, आखतवाडा, पिंप्री मोडक, रामनगर.

०००००००००००००

मंगरूळपीर तालुका (१९) : लखमापूर, बोरव्हा, शेंदुरजना मोरे, सायखेडा, घोटा, स्वासीन, जांब, पिंप्री खु., चिंचाळा, लाठी, पिंपळखुटा, शेलगाव, तपोवन, नागी, पिंप्री (अवगन), उमरी बु., जनुना, जाेगलदरी, पारवा.

---------------

रोहयोतून मजुरांच्या हाताला काम

पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षलागवड करून पर्यावरणसंवर्धन करणे हाच उद्देश नाही, तर या माध्यमातून मजुरांच्या हाताला कामही दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातून किमान पाच मजुरांच्या आधारे ४३ ग्रामपंचायतींत ही वृक्षलागवड केली जाणार आहे. वृक्षलागवडीनंतर याच कामगारांना या वृक्षांच्या संगोपन आणि संवर्धनाचे कामही दिले जाणार आहे.

००००००००००००००००

काय आहे बिहार पॅटर्न

धुळे जिल्ह्यातील बिहारी नावाच्या एका गरीब शेतकऱ्याने राबविलेला वृक्षलागवडीसह संगोपन, संरक्षणाचा प्रकल्प यशस्वी ठरला. त्यामुळे लावलेली झाडे जगवता येऊ शकतात. त्याचे संरक्षण होऊ शकते, हा विश्वास व्यक्त झाला. त्या व्यक्तीच्या नावावरून त्या संकल्पनेला अर्थात वृक्षलागवड, संगोपन आणि संरक्षणाच्या पॅटर्नला ‘बिहार पॅटर्न’ असे नामकरण केले गेले. ‘बिहार पॅटर्न’ हा प्रयोग राज्यात २००८ पासून राबविला जात आहे.

०००००००००००००००००००००००

कोट :

समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गावांचा सर्वांगीण विकास हेच पानी फाउंडेशन स्पर्धेमागील उद्दिष्ट आहे. वृक्षलागवडीतून पर्यावरणसंवर्धन आणि त्यातून दीर्घकाळ मजुरांच्या हाताला काम, याच उद्देशाने सहभागी ४३ गावांत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षलागवड केली जाणार आहे.

-सुभाष नानवटे,

जिल्हा समन्वयक, पानी फाउंडेशन

Web Title: Planting of lakhs of trees on the pattern of Bihar pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.