वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी वटवृक्षांचे रोपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 03:45 PM2018-06-26T15:45:31+5:302018-06-26T15:46:35+5:30

वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलतर्फे यावर्षीही राबविला जाणार आहे.

Planting of multipurpose tree in washim | वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी वटवृक्षांचे रोपण !

वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी वटवृक्षांचे रोपण !

Next
ठळक मुद्दे विकास कामांसाठी पूर्वीच्याकाळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आलेली आहे. वडांच्या झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व ईको क्लबच्या चिमुकल्यांनी केले.

  
वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलतर्फे यावर्षीही राबविला जाणार आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून २६ जून रोजी एसएमसी इंग्लिश स्कूल परिसरात वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.
वडाच्या झाडाला वर्षभर पिकलेली फळे येत असल्यामुळे बºयाच प्राण्यांना व पक्ष्यांना अन्न मिळते. फळे खाण्यासाठी शेकडो पक्षी वटवृक्षावर जणू तुटुनच पडतात. तसेच बरेच प्राणी व पक्षी वडाच्या झाडाचा निवा-यासाठी उपयोग करतात. वटवृक्ष हा एक संपूर्ण परिसंस्थेचे उदाहरण आहे. या वृक्षाला फुटणाºया परिसंस्था त्यांचे स्वतंत्र वृक्षात रुपांतर होउन त्याला मिळणारे दीघार्युष्य या गुणधर्मामुळे त्याला ‘अक्षय वृक्ष’ असेही म्हटले जाते. आजच्या काळात ब-याच विकास कामांसाठी पूर्वीच्याकाळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आलेली आहे. वडाचे झाड हळूहळू वाढते. आजच्या गतिमान जगामध्ये बहुतेकजण लागवडीसाठी जलद वाढणा-या व शोभीवंत वृक्ष प्रजातीची निवड करतात. त्यामुळे पुरातन काळात जतन करण्यात आलेल्या या वृक्षांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. आपल्या पुर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्व ओळखुन संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्याने वटपूजा करण्याची प्रथा रूढ केली. पुर्वीच्याकाळी स्त्रिया वडाच्या झाडाच्या ठिकाणी जावून वटपूजा करीत असत. तथापि आता वडांच्या झाडांची संख्या कमी झाल्याने वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करण्याची पद्धत रुढ होत आहे. ही बाब वटपौर्णिमा साजरी करण्याच्या मुळ उद्देशासाठी पूर्णत: विसंगत असुन त्यामुळे उलट वडांच्या झाडांची बेसुमार छाटनी होते. या अनिष्ठ प्रथेला आळा घालण्यासाठी एसएमसी इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षिका प्रतीक्षा कान्हेड,  भाग्यश्री ठोके, स्नेहल राऊत, राधिका बेदरकर, वर्षा पाटील तसेच राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थींच्या हस्ते वटपौर्णिमेला वटवृक्षारोपण केले जाते. जनजागृती म्हणून २६ जून रोजीदेखील वटवृक्षारोपण करण्यात आले तसेच या वटपौर्णिमेला पर्यावरण्याच्या दृष्टिने वडाला असलेले महत्व लक्षात घेउन वडाच्या फांद्या न तोडता वडांच्या झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व ईको क्लबच्या चिमुकल्यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत जोशी यांनी केले.

Web Title: Planting of multipurpose tree in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.