युवकांकडून रस्त्याच्या दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:05 PM2018-09-09T14:05:58+5:302018-09-09T14:06:42+5:30

वाशिम: कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगिर येथील युवकांनी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास उराशी बाळगून तालुक्यातील माळेगाव रस्त्यावर दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड केली.

Planting of trees road side in washim district | युवकांकडून रस्त्याच्या दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड 

युवकांकडून रस्त्याच्या दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगिर येथील युवकांनी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास उराशी बाळगून तालुक्यातील माळेगाव रस्त्यावर दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड केली असून, हे सर्व वृक्ष जगविण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
पर्यावरण संवर्धनाबाबत सर्वसाधारण लोक चांगलेच जागृत झाले असून, आता शासनाच्या वृक्ष लागवडीसह व्यक्तीगत आणि सामुहिक पद्धतीने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येकच तालुक्यात स्वयंसेवी संस्था आणि काही परिवार स्वयंस्फूर्तीने रोपवाटिकेतून रोपे आणत त्यांची लागवड करीत आहेत. कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगिर येथील युवकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला असून, हे युवक गावाच्या सभोवताल प्रत्येक रस्त्यावर वृक्षांची लागवड काही दिवसांपासून करीत आहेत. या उपक्रमांतर्गत त्यांनी कारंजा तालुक्यातील माळेगाव रस्त्याच्या दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड केली आहे. या उपक्रमात प्रशांत कुºहाडे, भुषण वानखडे, स्वप्निल वानखडे,  शुभम पवार, पियुष राठोड, रोहित चव्हाण, आशिष राठोड, आर्यन जाधव, तेजस पवार, अभय जाधव, नितेश राठोड, धिरज जाधव, निलेश जाधव, दिनेश राठोड, मुकेश राठोड, इंद्रजित पवार, अभिजीत जाधव, हर्षल राठोड, पवन पवार, मिथुन पवार, हरीश जाधव आदि युवकांनी सहभाग घेतला.

Web Title: Planting of trees road side in washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम