बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच!
By admin | Published: January 9, 2015 01:37 AM2015-01-09T01:37:39+5:302015-01-09T01:37:39+5:30
वाशिम जिल्ह्यातील प्रकार; अंमलबजावणी नाही.
वाशिम : प्लास्टिक पिशव्यांमुळे निसर्गाचा होणारा र्हास पाहता शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली. वाशिम नगरपालिकेच्यावतीनेही प्लास्टिक पिशव्या बंद व्हाव्यात, यासाठी अभियान राबवून जनजागृती केली. याला काही जणांनी प्रतिसाद दिला तर काहींनी बगल. प्लास्टिक पिशव्या बंदीवरील निर्णयासंदर्भात व वाशिम नगर परिषदेने घेतलेल्या पुढाकारासंदर्भात लोकमतने केलेल्या सर्वेक्षणामध्ये प्लास्टिक पिशव्यांची बंदी आवश्यक आहे; परंतु त्या बंद झाल्या नसल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले.
लोकमतने केलेल्या सर्वेक्षणामध्ये प्लास्टिक पिशव्या बंद झाल्यानंतर त्या बंद झाल्या काल या प्रश्नावर ७0 टक्के नागरिकांनी नाही तर केवळ १0 टक्के नागरिकांनीच काही प्रमाणात बंद झाल्याचे सांगितले. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी योग्य आहे काय, यावर मात्र ९0 टक्के नागरिकांनी बंदी योग्य असल्याचे सांगितले. नागरिकांकडूनच प्लास्टिक पिशव्यांची मागणी होत असल्याच्या उत्तरावर मात्र ८0 टक्के लोकांनी होकार दिला. प्लास्टिक पिशव्या बंदीनंतर नुकसान कोणाचे होते, या प्रश्नावर मात्र ५0 टक्के नागरिकांनी व्यापार्यांचे, असे उत्तर दिले. याबाबत कसे? याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांना पिशवी न दिल्यास ते वस्तू खरेदी न करता निघून जात असल्याचे सांगण्यात आले. ४0 टक्के लोकांनी निसर्गाचा र्हास होतो तर १0 टक्के लोकांनी नागरिकांचे नुकसान होत असल्याचे सांगि तले. प्लास्टिक पिशव्यांमुळे काय परिणाम होतो याची कल्पना आहे काय, या संदर्भात मात्र ९0 टकके लोकांनी परिणामाची कल्पना असल्याचे सांगितले. ५ टक्के लोकांनी माहित नसल्याचे तर ५ टक्के लोकांनी थोडी फार कल्पना असल्याचे सांगण्यात आले.