प्लास्टिक बंदीमुळे दूधडेअरीवाले अडचणीत: भांडे घेऊन येण्याची सुचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:41 PM2018-06-25T18:41:23+5:302018-06-25T18:42:56+5:30

दूधडेअरीधारकांनी प्लास्टिकचा त्याग केला असून, आता ग्राहकांना दुधासाठी घरूनच भांडे आणण्याची सुचना ते करीत आहेत.

Plastic ban: dairy milk, The suggestion of carrying the vessel | प्लास्टिक बंदीमुळे दूधडेअरीवाले अडचणीत: भांडे घेऊन येण्याची सुचना 

प्लास्टिक बंदीमुळे दूधडेअरीवाले अडचणीत: भांडे घेऊन येण्याची सुचना 

googlenewsNext
ठळक मुद्देव्यावसायिक प्लास्टिकपासून चार हात दूरच झाले आहेत, तर ग्राहकांनीही प्लास्टिकचा हट्ट सोडला आहे;धान्य, कपडे, फळे यासाठी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर सहज शक्य असला तरी, तरल पदार्थांच्या खरेदी विक्रीत मात्र प्लास्टिकबंदीने मोठी पंचाईत केली आहे.प्लास्टिक पिशव्या बंद केल्या असून, दुधासाठी येणाºया ग्राहकांना ते भांडे घेऊन येण्याच्या सुचना करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यभरात प्लास्टिक बंदीची मोहिम कठोरपणे राबविण्यात येत असताना विविध व्यावसायिकांनी त्याचा मोठा धसका घेतला आहे. तथापि, जड पदार्थांची बांधणी करण्यासाठी कागदी पिशव्या, कापडी पिशव्यांसारखे पर्याय असले तरी तरल पदार्थ त्यातही प्रामुख्याने दूधाच्या विक्रीत मोठ्या अडचणी आल्या आल्या आहेत. दूधडेअरीधारकांनी प्लास्टिकचा त्याग केला असून, आता ग्राहकांना दुधासाठी घरूनच भांडे आणण्याची सुचना ते करीत आहेत.
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी मोहिमेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसह संबंधित प्रशासनाकडून बाजारपेठा, किरकोळ दुकाने, भाजीबाजारांवर बारिक नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. प्लास्टिकचा वापर करणाºयाला ५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद असून, त्याचा फटकाही अनेकांना या बंदीच्या पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळाला. त्यामुळे व्यावसायिक प्लास्टिकपासून चार हात दूरच झाले आहेत, तर ग्राहकांनीही प्लास्टिकचा हट्ट सोडला आहे; परंतु भाजीपाला, धान्य, कपडे, फळे यासाठी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर सहज शक्य असला तरी, तरल पदार्थांच्या खरेदी विक्रीत मात्र प्लास्टिकबंदीने मोठी पंचाईत केली आहे. यामध्ये दूधडेअरीधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी आकारमानानुसार प्लास्टिक पिशवीत दूध मोजून देऊन ते जागेवरच सीलही करून दिले जायचे; परंतु आता मात्र प्लास्टिक बंदी झाल्याने त्यांनी प्लास्टिक पिशव्या बंद केल्या असून, दुधासाठी येणाºया ग्राहकांना ते भांडे घेऊन येण्याच्या सुचना करीत आहेत. 
 
प्लास्टिकचा खर्च वाचला; परंतु मशीनचा बोजा वाढला.
शासनाने प्लास्टिकबंदी केल्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना एकतर कागदात वस्तू बांधून देत आहेत किंवा पिशव्या आणण्याच्या सुचना करीत आहेत. त्यामुळे त्यांचा प्लास्टिकचा खर्च वाचला आहे. दूधडेअरीधारकांना या बंदीचा एकप्रकारे मोठा फायदाच झाला असे म्हणता येईल. कारण जडवस्तूंसाठी पूर्वीही व्यावसायिक पेपरची रद्दी वापरत किं वा खरेदीचे प्रमाण अधिक असले तर ग्राहकही कापडी पिशव्या नेत असत. दुधडेअरीत मात्र केवळ प्लास्टिकचाच अधिक वापर होत असे. आता प्लास्टिकबंदीमुळे त्यांचा मोठा खर्च वाचला; परंतु प्लास्टिकमध्ये दूध टाकल्यानंतर ते सील करण्यासाठी घेतलेल्या मशीन मात्र निकामी झाल्या आहेत. त्या कोणी विकतही घेणार नसल्याने या मशीनचा बोजाच दूधडेअरीधारकांना झाला आहे.

Web Title: Plastic ban: dairy milk, The suggestion of carrying the vessel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.