तलाठ्यालाच पडला प्लास्टिक बंदीचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:23 PM2018-06-26T16:23:31+5:302018-06-26T16:26:36+5:30

मालेगाव (वाशिम) : २३ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू झालेल्या प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आलेली आहे. मात्र, महसूल विभागातील मुख्य घटक असलेल्या एका तलाठ्याने चक्क मतदार नोंदणी कार्यक्रमात प्लास्टिक पिशवी टेबलवर ठेवून कामकाज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

plastic ban; government servet forgotten! | तलाठ्यालाच पडला प्लास्टिक बंदीचा विसर!

तलाठ्यालाच पडला प्लास्टिक बंदीचा विसर!

Next
ठळक मुद्दे पातळ-जाड, बंध असलेल्या-नसलेल्या अशा सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरावर सक्तीने बंदी लादण्यात आलेली आहे. एका तलाठ्याने आपली कागदपत्रे प्लास्टिक पिशवीत आणून ती चक्क टेबलवर ठेवल्याने अनेकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. संबंधित तलाठ्याविरूद्ध याप्रकरणी काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव (वाशिम) : २३ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू झालेल्या प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आलेली आहे. मात्र, महसूल विभागातील मुख्य घटक असलेल्या एका तलाठ्याने चक्क मतदार नोंदणी कार्यक्रमात प्लास्टिक पिशवी टेबलवर ठेवून कामकाज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मंगळवार, २६ जून रोजी हा प्रकार उघडकीस आला.

 राज्यभरात २३ जूनपासून लागू झालेल्या प्लास्टिक बंदी कायद्यान्वये पातळ-जाड, बंध असलेल्या-नसलेल्या अशा सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरावर सक्तीने बंदी लादण्यात आलेली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध दंडाची तरतूद असून पहिल्या वेळी ५ हजार रुपये, दुसºया वेळी १० हजार रुपये आणि तिसºया वेळी प्लास्टिक पिशवीचा वापर करताना संबंधित आढळून आल्यास २५ हजार रुपये दंड व किमान तीन महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार, प्लास्टिक बंदी कायद्याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू झाली आहे. असे असताना शिरपूर जैन येथे २६ जून रोजी आयोजित मतदार नोंदणी कार्यक्रमात एका तलाठ्याने आपली कागदपत्रे प्लास्टिक पिशवीत आणून ती चक्क टेबलवर ठेवल्याने अनेकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. दरम्यान, संबंधित तलाठ्याविरूद्ध याप्रकरणी काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: plastic ban; government servet forgotten!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.