‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 02:09 PM2020-01-07T14:09:57+5:302020-01-07T14:10:34+5:30

वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये १० जानेवारीपासून प्रशासनाकडून मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

PM kisan sanman scheme : Farmers meetings from friday in Washim | ‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे

‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गंत अद्यापपर्यंत नोंद न झालेल्या पात्र लाभार्थी शेतकºयांची नोंदणी करण्यासाठी व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी जिल्ह्यात येत्या शुक्रवार, १० जानेवारीपासून तालुकास्तरीय मेळावे होणार आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती देताना निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले, की जिल्ह्यातील ज्या शेतकºयांची नावे आधार ‘फेल्यूअर रेकॉर्ड’ यादीत आहेत, त्यांनी ती दुरूस्ती करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सोसायटी सचिव आदिंकडे आधारकार्ड आणि बँकेच्या पासबूकची छायांकित प्रत सादर करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रामार्फत आधार कार्डावरील नाव आधार क्रमांक दुरूस्त तसेच लिंक करून घ्यावेत.
ही प्रक्रिया बिनचूक पार पडावी, यासाठी शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये १० जानेवारीपासून प्रशासनाकडून मेळावे आयोजित केले जाणार आहेत. या मेळाव्यांमध्ये जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यांमधील बँकांच्या प्रतिनिधींनाही बोलाविण्यात येऊन लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंगे यांनी दिली.
 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १ डिसेंबर २०१९ नंतर पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारे सर्व हप्ते आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्येच अदा करण्यात येणार आहेत; मात्र अद्यापही अनेक पात्र लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक नसल्याने असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ही बाब लक्षात घेऊन १० जानेवारीपासून तालुकास्तरीय मेळाव्यांचे आयोजन करून आधार लिंकच्या कामाकडे विशेष लक्ष पुरविले जाणार आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: PM kisan sanman scheme : Farmers meetings from friday in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.