कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात न्युमोनिया, मधुमेह सर्वात पुढे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:45 AM2021-04-28T04:45:07+5:302021-04-28T04:45:07+5:30

वाशिम : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आणि त्यातच न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा धोका ...

Pneumonia, diabetes leading to corona positive on the verge of death! | कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात न्युमोनिया, मधुमेह सर्वात पुढे !

कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात न्युमोनिया, मधुमेह सर्वात पुढे !

Next

वाशिम : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आणि त्यातच न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक संभवतो. १ मार्च ते २७ एप्रिल या दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे ११० रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये जवळपास ९२ टक्के मृतांना न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजारही होते.

जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर जून महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचा आकडाही वाढला. त्यानंतर मात्र कोरोनाचा आलेख खाली आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा अल्पायुषी ठरला असून, फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यापासून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नेमके कोणत्या कारणाने मृत्यू होत आहेत यामागील कारणे आरोग्य विभागाने जाणून घेतली असता, न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जवळपास ९२ टक्के मृत्यू पावलेल्या रुग्णांना न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदयविकार आदी आजार असल्याचे समोर आले. जिल्ह्यात कोरोनामुळे मार्च महिन्यात २७ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात २७ तारखेपर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाशिवाय अन्य कोणताही आजार नसलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, न्युमोनिया, हृदयविकार, किडनी आदी आजार असलेल्या रुग्णांनी घराबाहेर न पडणे, कुणाच्याही संपर्कात न येणे, नियमित औषधोपचार घेणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. वेळीच निदान व उपचार मिळाले तर रुग्ण या आजारातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येताच तातडीने कोरोना चाचणी करावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

००००

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?

कोरोनाकाळात प्रत्येक व्यक्तीने आरोग्याप्रति जागरूक राहणे ही काळाची गरज ठरत आहे. विशेषत: न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी, हृदयविकार आदी आजार असलेल्या रुग्णांनी घराबाहेर न पडता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांच्या संपर्कात येऊ नये. घरात वयोवृद्ध आई-वडील, व्याधीग्रस्त नागरिक असतील तर युवावर्गानेदेखील आपल्यापासून घरातील ज्येष्ठांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.

००००

मार्च, एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील एकूण मृत्यू १३२

इतर आजारामुळे २२

कोरोनामुळे मृत्यू ११०

००००

Web Title: Pneumonia, diabetes leading to corona positive on the verge of death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.