मासेमारीसाठी चिरकुटा प्रकल्पाच्या सभोवताल टाकले विषारी औषध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 05:34 PM2019-07-20T17:34:04+5:302019-07-20T17:34:37+5:30
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे. यामुळे पाणी प्यावे लागणाºया नागरिकांचा जीव धोक्यात सापडला असून खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सर्वच गावांचा पाणीपुरवठा बंद करून या गंभीर प्रकाराची चौकशी हाती घेतली आहे.
मानोरा शहरासह तालुक्यातील २८ गावांना चिरकुटा प्रकल्पावरून पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. दरम्यान, प्रकल्पाच्या सभोवताल तसेच जलशुद्धीकरण केंद्राजवळही काही इसम विषारी औषध टाकून मासेमारी करित असल्याचा प्रकार घडत आहे. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने खबरदारी म्हणून तातडीने पुढील आदेशापर्यंत पाणी पुरवठा बंद केला आहे.
अरुणावती प्रकल्पावर मासेमारी करण्याच्या ठेका सन २०२१ पर्यंत मे ब्रिज फिशरीज, दिग्रस या कंपनीला देण्यात आला असून पाण्यात विषारी द्रव्य टाकून मासेमारी होत असल्याची तक्रार कंपनीकडून अरुणावती पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता व पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली. यासंदर्भात संबंधित प्रशासकीय यंत्रणा दोषींविरूद्ध काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.