शिक्षकाच्या पाण्याच्या बॉटलमध्ये मिसळले विषारी द्रव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 15:12 IST2020-02-27T15:11:05+5:302020-02-27T15:12:10+5:30
कडोळी येथील प्रकार : शिक्षकावर वाशिममध्ये उपचार; प्रकृती धोक्याबाहेर

शिक्षकाच्या पाण्याच्या बॉटलमध्ये मिसळले विषारी द्रव्य
ल कमत न्यूज नेटवर्कवाशिम : कडोळी (ता. सेनगाव, जि.हिंगोली) येथील रमतेराम महाराज विद्यालयातील शिक्षक शिवाजी घुगरे यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये कुणीतरी अज्ञात इसमाने सोमवार, २४ फेब्रूवारीला विषारी द्रव्य मिसळले. तेच पाणी प्याल्याने त्यांचा जीव धोक्यात सापडला. दरम्यान, वाशिम येथील वाशिम क्रिटीकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी गुरूवार, २७ फेब्रूवारी रोजी दिली.प्राप्त माहितीनुसार, २४ फेब्रूवारीला विषारी द्रव्य मिसळलेल्या बॉटलमधील पाणी प्याल्याने शिक्षक शिवाजी घुगरे यांना उलट्या झाल्या. त्यांच्यावर गोरेगाव (जि.हिंगोली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर हिंगोलीला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले; मात्र घुगरे हे हिंगोली न जाता किंवा वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती न होता वाशिम क्रिटीकल रुग्णालयात उपचारासाठी भरती झाले. सद्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.दरम्यान, २६ फेब्रूवारीला वाशिम शहर पोलिस स्टेशनचे जमादार रामेश्वर इंगोले यांनी शिक्षक घुगरे यांचे बयाण घेतले असता, आपला कुणावरही संशय नसून कुणावर काय कार्यवाही करायची, ते रमतेराम महाराज विद्यालय प्रशासन ठरवेल, असे त्यांनी सांगितले.