वाशिम जिल्ह्यात घरोघरीच साजरा झाला पोळा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 07:36 PM2020-08-18T19:36:13+5:302020-08-18T19:36:48+5:30

कोरोनामुळे यंदा प्रथमच पोळा सणाची परंपरा खंडीत झाली.

Pola Festival was celebrated in Washim district | वाशिम जिल्ह्यात घरोघरीच साजरा झाला पोळा सण

वाशिम जिल्ह्यात घरोघरीच साजरा झाला पोळा सण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनामुळे यंदा सार्वजनिक पद्धतीला फाटा मिळाला असून, शेतकऱ्यांनी घरोघरी पोळा साजरा करीत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनामुळे यंदा प्रथमच पोळा सणाची परंपरा खंडीत झाली. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरीबांधव पोळा सण उत्साहात साजरा करतात. दरवर्षी जिल्ह्यात विविध पद्धतीने पोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गचे संकट असल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून पोळा सणही सुटू शकला नाही.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन आहे तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पोळा सण सार्वजनिक पद्धतीने साजरा न करता घरच्या घरीच साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्यानुसार १९ आॅगस्ट रोजी सार्वजनिक पद्धतीने जिल्ह्यात कुठेही पोळा सण साजरा करण्यात आला नाही. वाशिम येथे बालाजी मंदिर परिसरात दरवर्षी मोठा पोळा भरविण्यात येतो. यावर्षी केवळ दर्शनासाठी बैल आणण्यात आले. वाशिमप्रमाणेच रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथेही सार्वजनिक पद्धतीने पोळा सण साजरा न करता घरोघरीच शेतकऱ्यांनी पोळा साजरा करीत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनामुळे यावर्षी पहिल्यांदाच पोळा सणाची परंपरा खंडीत झाल्याचे शल्य शेतकºयांमध्ये आहे.


ट्रॅक्टरच्या पोळ्याची परंपरा खंडीत
वाशिमपासून १० किलोमिटर अंतरावरील कनेरगाव येथे बैलांऐवजी दरवर्षी ट्रॅक्टरचा पोळा भरविला जातो. यावर्षी कोरोनामुळे कनेरगाव येथील परंपरा खंडित झाली आहे. ट्रॅक्टर म्हणजे शेतीतील अत्यंत उपयोगी यंत्र असल्याने कनेरगावात ट्रॅक्टरलाच बैल मानून कनेरगावात ट्रॅक्टरचा पोळा मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा केल्या जातो. या ट्रॅक्टरची पूजा करून गावात पोळ्याच्या दिवशी मिरवणूक काढली जाते. यावर्षी कोरोनामुळे ट्रॅक्टरचा पोळाही भरला नाही.

Web Title: Pola Festival was celebrated in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.