युवक मृत्यूप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

By admin | Published: March 6, 2017 02:30 AM2017-03-06T02:30:22+5:302017-03-06T02:30:22+5:30

सावरखेड फाट्यानजिकच्या आढळला होता मृतदेह; चार आरोपींना १0 मार्चपर्यंत पोलीस कोठडी.

Police cell detained for killing youth | युवक मृत्यूप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

युवक मृत्यूप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

Next

मालेगाव, दि. ५- येथील युवक नितीन रुस्तम कांबळे (वय ३0 वर्षे) याच्या मृत्यूप्रकरणी मालेगाव पोलिसांनी ४ मार्चला चार संशयित आरोपींना ताब्यात घेत ५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १0 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, की मेडशी आणि पातूरच्या सीमेवर येणार्‍या सावरखेड फाट्यानजिकच्या शेतात शुक्रवार, ३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास युवकाचा मृतदेह आढळून आला. तो मेडशी येथील नितीन कांबळे याचा असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली.
याप्रकरणी शनिवार, ४ मार्चला सकाळी मेडशी येथील तलाठी कोल्हे यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून याप्रकरणी बुर्‍हाण युनूस पठाण, अकबर युनूस पठाण, राजू विष्णू साठे आणि निजाम छोटू जान पठाण या चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना ५ मार्च रोजी मालेगाव येथील न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असता न्यायालयाने चौघांनाही १0 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
तथापि, हे प्रकरण घातपाताचे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच प्रकरणाचा छडा लागेन, असे संकेत मालेगाव पोलिसांनी दिले.

Web Title: Police cell detained for killing youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.