नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:25+5:302021-06-04T04:31:25+5:30

काेराेना संसर्ग पाहता खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी दिसून येत असले ...

Police crackdown on violators | नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

Next

काेराेना संसर्ग पाहता खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी दिसून येत असले तरी अद्याप काेराेना हद्दपार झालेला नाही. काेराेना रुग्णांची घटती संख्या लक्षात घेता कडक निर्बंधात बहुतांश शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ वाजताच्या वेळेत बदल करून दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. पूर्वी ७ ते ११ वाजेपर्यंत नागरिक आपली कामे आटाेपून घ्यायची परंतु आता दाेन वाजेपर्यंत सुद्धा कामे आटाेपून घेत नसल्याने शहरामध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे. याकरिता शहर वाहतूक शाखेतर्फे काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक चाैकाचाैकात पाेलीस कर्मचारी तैनात असून, प्रत्येक वाहनाची झाडाझडती साेबतच विनामास्क फिरणाऱ्या कारवाई करण्यात येत आहे. याकरिता खुद्द शहर वाहतूक शाखेचे प्रमुख नागेश माेहाेड रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहेत.

शहर वाहतूक शाखा निरिक्षक प्रत्येक चाैकाचाैकात दरराेज वेळ देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई माेहिमेचा आढावा घेताना दिसून येत आहे.

...............

नगर परिषदेने सुरू केली काेराेना चाचणी

गर्दीच्या ठिकाणी नगर परिषदेतर्फे नागरिकांची काेराेना चाचणी सुरू केली आहे. तसेच काेराेना संसर्ग राेखण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, नागरिकांनी पथकाला सहकार्य करून काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक माेरे व नगराध्यक्ष अशाेक हेडा यांनी केले आहे.

.............

काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी हाेत असले तरी अद्याप काेराेना हद्दपार झालेला नाही. तरी काही नागरिक काेराेना नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. अशांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करून पाेलिसांना सहकार्य करावे. वाहतूक नियमांचे पालन करा.

- नागेश माेहाेड,

शहर वाहतूक शाखा प्रमुख

Web Title: Police crackdown on violators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.