चोरी प्रकरणी आरोपीस २ दिवसांची पोलिस कोठडी
By admin | Published: September 15, 2014 12:41 AM2014-09-15T00:41:01+5:302014-09-15T00:41:01+5:30
रिसोड तालुक्यातील चो-यांचा सुगावा लागणार.
रिसोड : स्थानिक सिव्हील लाईन भागातील गीता फर्निचरमध्ये गत १0 मार्च रोजी घडलेल्या चोरीचा छडा रिसोड पोलिसांनी तब्बल सहा महिन्या नंतर लावला. पोलिसांनी चोरट्यास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस सुत्राकडून प्राप्त माहितीनूसार गीता फर्निचरमध्ये गत १0 मार्चला अज्ञात चोरट्यांनी २ एलईडी टीव्हीचा संच लंपास केल्याची घटना घडली होती. सदर घटनेमधील १ टीव्ही संच येथील एका दुकानदाराकडे विक्रीसाठी सदर आरोपीने आणला होता. याबाबत गिता फर्निचरचे मालक व पोलिसांना माहिती मिळताच टिव्ही संच विकणारा आरोपी दिपक काळे यास अटक करून त्यांच्याविरुध्द कलम ४५७ व ३८0 भांदवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.