लाचप्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी
By admin | Published: June 24, 2016 12:05 AM2016-06-24T00:05:37+5:302016-06-24T00:05:37+5:30
लाचखोर मुख्याधापक व लिपीकास एक दिवससाची पोलीस कोठडी.
वाशिम : शाळा अनुदानित असतानाही इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या कारंजा येथील एका शाळेचे मुख्याध्यापक व लिपिकाला एका दिवसाची पोलीस कोठडी विद्यमान न्यायालयाने गुरूवारी सुनावणी.
कारंजा (लाड) येथील १00 टक्के अनुदानित असलेल्या महाविर ब्रम्हचर्य आश्रम हायस्कुलमध्ये (म.ब्र.स्कूल) एका विद्यार्थ्याला पाचवीमध्ये प्रवेश देण्यासाठी
मुख्याध्यापक अरविंद नवलसंगई कस्तुरीवाले व लिपिक सुदिप सुर्यकांत मिश्रीकोटकर यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार एसीबीचे पोलीस उपअधिक्षक आर. व्ही. गांगुर्डे यांनी स्वत: आपल्या पथकासह बुधवारला दुपारच्या सुमारास कारंजा येथील म. ब्र. हायस्कुलच्या आवारामध्ये सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून मुख्याध्यापक कस्तुरीवाले व लिपीक मिश्रीकोटकर या दोघांना पंचासमक्ष पाच हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहात पकडले होते. या दोघांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान खासगी अनुदानित शाळेत नियमानुसार प्रवेशासाठी देणगी किंवा जादा शुल्क आकारता येत नाही. प्रवेशासाठी कुणी लाच मागत असेल तर तक्रार नोंदविण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले.