वाशिम शहरात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:16 AM2021-03-27T11:16:43+5:302021-03-27T11:16:49+5:30

Police officer beaten in Washim तिघांनी ‘आज गाडी चलान करके दिखा’, असे म्हणत सोन्नर यांना दमदाटी करून मारहाण केली.

Police officer beaten in Washim | वाशिम शहरात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

वाशिम शहरात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील पुसद नाक्यावर कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यास तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवार, २६ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. यामुळे मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत वाशिम शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सुधाकर सोन्नर यांनी यापूर्वी नियम उल्लंघनप्रकरणी वाहन चलान केले होते. त्याचा राग मनात धरून आज सायंकाळी पुसद नाक्यावर मद्यप्राशन करून आलेल्या तिघांनी ‘आज गाडी चलान करके दिखा’, असे म्हणत सोन्नर यांना दमदाटी करून मारहाण करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सदर पोलीस कर्मचारी तेव्हा पोलीस गणवेशात होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने पुसद नाक्यावर धाव घेत तीनही आरोपींना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Police officer beaten in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.