ज्येष्ठांच्या रक्षणासाठी पोलिसांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:40 AM2021-02-10T04:40:07+5:302021-02-10T04:40:07+5:30

................ वळणमार्गाअभावी वाहतूक विस्कळीत अनसिंग : राष्ट्रीय महामार्ग छेदून गेलेल्या वाशिममध्ये अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका या मुख्य ...

Police operation to protect seniors | ज्येष्ठांच्या रक्षणासाठी पोलिसांची मोहीम

ज्येष्ठांच्या रक्षणासाठी पोलिसांची मोहीम

Next

................

वळणमार्गाअभावी वाहतूक विस्कळीत

अनसिंग : राष्ट्रीय महामार्ग छेदून गेलेल्या वाशिममध्ये अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका या मुख्य चौकांमधूनच जड वाहने धावत आहेत. वळणमार्ग अद्याप निर्माण झाला नसल्याने ही समस्या उद्भवली असून वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.

..................

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

ताेंडगाव : अमानी ते पांगरी नवघरे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या अवघ्या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर चार फूट रुंद, सहा ते आठ फूट लांब आणि फूट, दीडफूट खोल आकाराचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान हाेत आहे. खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

..................

‘त्या’ खड्ड्यामुळे अपघाताची भीती

मंगरुळपीर : राष्ट्रीय महामार्गालगत जलवाहिनीचे व्हॉल्व्ह खुले ठेवण्यासाठी खड्डे खोदले आहेत. तथापि, खड्ड्यांचे काँक्रिटीकरण करून त्यावर झाकण बसविण्यात आले नाहीत. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने एखाद वेळी अपघात घडण्याची भीती आहे.

...............

प्राचीन तलावाची स्वच्छता

कारंजा लाड : नगरपालिका प्रशासनाकडून राज्य शासनाच्या सूचनेनुसार माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तलावातील गाळ, कचऱ्याचा उपसा करून या तलावाची पालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात येत आहे.

.....................

गायवळ प्रकल्पात अपुरा जलसाठा

कारंजा : गतवर्षी कारंजा तालुक्यात दमदार पाऊस पडल्याने प्रकल्पांची पातळी १०० टक्के झाली. त्यात गायवळ प्रकल्पाचाही समावेश होता; परंतु या प्रकल्पाची खोली कमी असतानाच सिंचन उपशामुळे या प्रकल्पात ५० टक्केपेक्षा कमी साठा दिसून येत आहे.

................

घरकुल लाभार्थींना निधीची प्रतीक्षा

तळप बु. : मानोरा पं.स. अंतर्गत येत असलेल्या ग्रा.पं. तळप बु. येथील अनुसूचित जातीमधील नऊ लाभार्थींना रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले; परंतु वर्ष उलटले तरी या लाभार्थींच्या खात्यात घरकुल अनुदानाचा निधी जमा करण्यात आला नाही.

...............

रस्ता दुरुस्त करा

वाशिम : पाटणी चाैक ते अकाेला नाका रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्ता दुुरुस्तीची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Web Title: Police operation to protect seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.