घाणीच्या विळख्यात अडकली मंगरुळपीर येथील पोलीस चौकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:27 PM2018-06-06T13:27:29+5:302018-06-06T13:27:29+5:30

मंगरुळपीर  : येथील अत्यंत महत्वाच्या सुभाष चौकातील पोलीस चौकीची सध्या दुरावस्था झाली असुन या चौकीच्या डागडुजीकडे सबंधीत विभागाचे दुर्लक्ष आहे.

Police outpost in Mangrilpir, trapped in the dump | घाणीच्या विळख्यात अडकली मंगरुळपीर येथील पोलीस चौकी

घाणीच्या विळख्यात अडकली मंगरुळपीर येथील पोलीस चौकी

Next
ठळक मुद्देसध्या ही चौकी पुर्णत: मोडकळीस आली असुन आजुबाजुला घाणीचे साम्राज्य आहे.इमारतीची दुरावस्था असुन पावसाळ्यात पाणीही गळत असल्याचे समजले.

मंगरुळपीर  : येथील अत्यंत महत्वाच्या सुभाष चौकातील पोलीस चौकीची सध्या दुरावस्था झाली असुन या चौकीच्या डागडुजीकडे सबंधीत विभागाचे दुर्लक्ष आहे.

गजबजलेल्या वस्तीत आणी ज्या परिसरात मुलीमधर्मिय तसेच हिंदुधर्मीय यांची संख्या जास्त आहे.याच परिसरातुन विविध सण ऊत्सवाच्या मिरवणुकाही काढल्या जातात.मिरवणुकीच्या वेळी पोलिस बंदोबस्त लावन्यात येतो. काही कीरकोळ बाबी वगळल्यास आतापर्यत सर्व शांतता नांदत आहे परंतु शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणची म्हणजेच सुभाष चौकातील पोलिस चौकी सुरु असणे महत्वाचे असल्याचे शहरवाशीयांचे म्हणने असुन वेळोवेळी त्या ठिकाणी पोलीसांच्या ड्युट्या लावाव्यात अशी मागणी होत आहे.सध्या ही चौकी पुर्णत: मोडकळीस आली असुन आजुबाजुला घाणीचे साम्राज्य आहे.इमारतीची दुरावस्था असुन पावसाळ्यात पाणीही गळत असल्याचे समजले.परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हनून या चौकीची डागडुजी करुन ही चौकी सुरु करावी आणी पोलीसांच्या ड्युट्या लावाव्यात म्हनजे परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही याला आळा बसेल अशी मागणी होत आहे.अनेक वषार्पासुन सुभाष चौकातील पोलिस चौकीचा दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबीत असुन याविषयी कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नसुन आता या प्रकरणी वरिष्ठांनीच लक्ष घालुन ही चौकी सुरु करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Police outpost in Mangrilpir, trapped in the dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.