पिंपळगाव येथे पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:58+5:302021-09-19T04:41:58+5:30
---------- कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन वाशिम : कृषी महाविद्यालय आमखेडाचे कृषिदूत सचिन काकडे, पंकज कांबळे यांनी तालुक्यातील काही गावांत १५ ...
----------
कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : कृषी महाविद्यालय आमखेडाचे कृषिदूत सचिन काकडे, पंकज कांबळे यांनी तालुक्यातील काही गावांत १५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना पिकांवरील कीड नियंत्रणासह शेततळ्याबाबत मार्गदर्शन केले. शेततळे तयार करताना घ्यावयाची काळजी, त्याची लांबी, रुंदी व खोली किती असावी, येथील जागा शेततळ्यासाठी योग्य आहे की नाही आदीबाबत मार्गदर्शन केले. शिवाय सोयाबीन पिकावरील शेंगा पोखरणारी अळी, पाने खाणाऱ्या अळीसह कपाशीवरील कीड नियंत्रणाबाबतही मार्गदर्शन केले.
०००००००००००००००००००
पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे प्रलंबित
पिंपळगाव डाकबंगला: परिसरातील गावात गेल्या आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तथापि, आठवडा उलटला तरी महसूल किंवा कृषी विभागाच्या कोणत्याच अधिकाऱ्याने अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानाची पाहणी करुन पंचनामे केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे.