उंबर्डा बाजार येथे पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:46 AM2021-01-13T05:46:25+5:302021-01-13T05:46:25+5:30

-------------- जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार वितरण धनज बु.: येथून जवळच असलेल्या हिंगणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ११ ...

Police patrol at Umbarda Bazaar | उंबर्डा बाजार येथे पोलिसांचे पथसंचलन

उंबर्डा बाजार येथे पोलिसांचे पथसंचलन

Next

--------------

जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार वितरण

धनज बु.: येथून जवळच असलेल्या हिंगणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ११ जानेवारी रोजी शालेय पोषण आहारातील धान्याचे वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत पालक आणि विद्यार्थ्यांना धान्याचे निर्धारित प्रमाणानुसार वितरण करण्यात आले.

-------------------

युवती, महिलांना मार्गदर्शन

युनिसेफ व युवा संस्थेचा उपक्रम

उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या शिवण येथे युनिसेफ आणि युवा संस्थेकडून शुक्रवारी युवती आणि महिलांना स्वच्छता विषयावर आणि अनुभव शिक्षा केंद्रच्या मूल्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच या महिलांना स्वच्छता कीटचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

------------

एसडीपीओकडून मतदान केंद्र परिसराची पाहणी

उंबर्डा बाजार : येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांनी १० जानेवारी रोजी राहाटी, हिंगणवाडी, सिरसोली, मेहा, पिंप्रीमोडक या गावांतील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी धनज बु. पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे उपस्थित होते.

-----

समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत मार्गदर्शन

काजळेश्वर : पानी फाउण्डेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी जानोरी गावाला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी भेट देऊन गाव समृद्ध करण्यासाठी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, पानी फाउण्डेशनचे तालुका समन्वयक रवींद्र लोखंडे यांच्यासह त्यांचे सहकारी आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Police patrol at Umbarda Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.