वाशिममध्ये आयपीएल क्रिकेट सट्यावर पोलीसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:12 PM2018-04-28T13:12:14+5:302018-04-28T13:14:31+5:30
वाशिम : शहरातील बँक अॉफ इंडिया समोर असलेल्या बलवंत रेसिडन्सी या हॉटेलमधील रुम नंबर १०१ मध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट अड्यावर शुक्रवारला (२८ एप्रिल ) रात्री शहर पोलीसांनी छापा टाकला.
वाशिम : शहरातील बँक अॉफ इंडिया समोर असलेल्या बलवंत रेसिडन्सी या हॉटेलमधील रुम नंबर १०१ मध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट अड्यावर शुक्रवारला (२८ एप्रिल ) रात्री शहर पोलीसांनी छापा टाकला. येथून पोलिसांनी एका बुकीला जेरबंद केले. त्याच्याकडून लॅपटॉप, पाच मोबाईल आणि सट्याची खायवाडी करणारे साहित्य जप्त केले.
शहरामधील बलवंत रेसिडन्सी या हॉटेलमधे मध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा सुरू असल्याची माहिती शिवाजी चौकीचे जमादार नितिन काळे यांना मिळाली. त्यांनी लगेच ही माहिती वरिष्ठ अधिकार्यांना कळवीली. वाशिम शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार शिवा ठाकरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव, शिवाजी चौकीचे जमादार नितिन काळे, सतिष गुडदे व पोलीस कर्मचारी यांनी २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताचे सुमारास बलवंत रेसिडन्सी मधील रुम नंबर १०१ मधे छापा टाकला. यावेळी अक्षय जोशी (बुकी, वय २२ रा. शिव चौक, वाशिम) हा मोबाईलद्वारे सट्टा घेत असताना आढळून आला. हा सट्टा आयपीएल क्रिकेट मालिकेमध्ये शुक्रवारला दिल्ली आणि कोलकाता या संघामध्ये सामना होता. या सामन्यावर खायवाडी सुरू असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले. पोलीसांनी खायवाडी करणारा अक्षय जोशी (रा. शिव चौक, वाशिम ) याला रात्री अटक केली. त्याचेकडून पाच मोबाईल, एक लॅपटॉप, व खायवाडीचे साहित्य असा एकुण ६५ ते ७० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्याचेविरूध्द विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आयपीएल क्रिकेट सट्यावर शहरातील ही दुसरी कारवाई आहे.