गावठी दारूभट्ट्यांवर पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:13+5:302021-07-07T04:51:13+5:30
------- पोलीस पाटील यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड लेवल’वर पोलीस पाटील ...
-------
पोलीस पाटील यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड लेवल’वर पोलीस पाटील व सरपंच हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्य करीत असून, त्यांचे मानसिक धैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली.
------
बँकेसमोर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : खरीप हंगामाकरिता पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. पीककर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने तहसील कार्यालयातही शेतकऱ्यांची एकच गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही.
---------
उकळीपेन येथे ‘एटीएम’ची मागणी
वाशिम : तालुक्यातील तुलनेने अधिक लोकसंख्या असलेल्या तथा हिंगोली-वाशिम या महामार्गावर वसलेल्या उकळीपेन या गावात ‘एटीएम’ची गरज भासत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
-------------
उघड्यावर शौचवारी; कारवाईची मागणी
शेलूबाजार : ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने गुडमॉर्निंग पथक पुन्हा सक्रिय करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
-------------
पीक कर्ज वाटपास गती देण्याची मागणी
वाशिम : खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज भासत आहे. असे असताना बँकांकडून पीक कर्ज वाटप संथगतीने सुरू आहे. त्यास गती देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
^^^^^
डिजिटल शेती शाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम : पानी फाउंडेशनकडून दर आठवड्यात सोयाबीन या पिकासाठी डिजिटल शेतीशाळा सुरू केली. या शेती शाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, उमेदच्या महिला यात सहभागी होत आहेत.