युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:20 PM2019-06-04T14:20:26+5:302019-06-04T14:20:53+5:30

वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Police recruitment free training for youths | युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण

युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता १० जून २०१९ रोजी वाशिम येथे शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. इच्छुक युवक, युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
१८ ते २५ वर्षे वयोगटातील इच्छुक युवक-युवतींना या प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येईल. याकरिता पुरुष उमेदवारांची छाती ७८ ते ८३ से.मी. असणे आवश्यक आहे, तसेच उंची किमान १६५ से.मी. असावी. महिलांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी १२ वी पास गुणपत्र, रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे सोबत आणणे आवश्यक आहे. निवड झालेल्या युवक-युवतींना अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे तीन महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाबाबतच्या सोयी-सुविधा शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

Web Title: Police recruitment free training for youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.