वाशिम पोलीस देणार युवकांना पोलीस भरती प्रशिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 03:41 PM2019-07-12T15:41:54+5:302019-07-12T15:44:16+5:30
बेरोजगार तरुण, तरुणींसाठी पोलीसदलाच्यावतीने प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणारा हा पहिलाच उपक्रम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना पोलीस भरतीबाबत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात वाशिमपोलिसांच्यावतीने पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरूण, तरूणींना नैपुण्यप्राप्त प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण, तरुणींसाठी पोलीसदलाच्यावतीने प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणारा हा पहिलाच उपक्रम आहे.
पोलीस भरतीचा सराव करणाºया तरूण तरूणींसाठी आयोजित प्रशिक्षणात शारिरीक व लेखी परिक्षेत येणाºया विविध विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. शारिरीक चाचणीसाठी आवश्यक पात्रता अंगी असावी म्हणून सराव घेण्यात येईल. सर्व जाती-धर्माच्या उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इयत्ता बारावी उतीर्ण व सुदृढ शारिरीक क्षमता असलेल्या व पोलीस भरतीचा सराव करणा-या इच्छूक उमेदवारांनी आपली नावे व मोबाईल कमांक आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात १५ जुलैर्पंत नोंदवावे लागणार आहेत. इच्छुक उमेदवरांकडून नोंदणीची माहिती प्राप्त झाल्यानंतर इच्छुक तरूण, तरुणींना प्रशिक्षणाची तारीख वाशिम पोलीस दलाकडून कळविण्यात येईल. हे प्रशिक्षण उत्साहात पार पाडता यावे आणि त्याचा लाभ आगामी पोलीस भरतीत तरूण, तरूणींना व्हावा म्हणून या प्रशिक्षणासाठी जास्तीतजास्त उमेदवारांनी नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फ पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे.