शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:39 PM2019-11-03T15:39:45+5:302019-11-03T15:39:53+5:30

काही युवकांनी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग घेण्याचे ठरवून शेतकऱ्यांना एकप्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे.

Police recruitment tuition classes for farmers' children | शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नैसर्गिंक संकटामुळे पार कोलमडून गेलेल्या शेतकºयाला आपलाही फायदा व्हावा याकरिता शहरातील सुक्षिशित काही युवकांनी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग घेण्याचे ठरवून शेतकऱ्यांना एकप्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. युवकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे.
वाशिम शहरातील सुशिक्षीत व स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शाम सावंत, भागवत सारसकर, अंकुश मगर, विजय मोरे, अंकुश नवघरे, प्रकाश नागलकर या युवकांनी अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे झालेले अतोनात नुकसान याची जाणीव ठेवून शेतकºयांच्या मुलांना मोफत शिकविण्याचा विचार मांडला. यावर सर्वांचे एकमत होवून तसा निर्णय घेण्यात आला. आपल्या व्यस्त वेळातून प्रत्येकाने दररोज ४ तास काढून या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. याकरिता नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांना १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन युवकांनी केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांकडून गतवर्षी व त्याआधी झालेल्या पोलीस भरतीचे पेपरही सोडवून घेण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा सराव पूर्ण होवून त्यांना याचा फायदा पोलीस भरतीमध्ये होणार असल्याचा मानस युवकांनी व्यक्त केला. शेतकºयांच्या पाल्यासाठी असा उपक्रम राबविणारे हे युवक जिल्हयात प्रथम ठरले असून त्यांच्या या उपक्रमामुळे इतरांनाही चालना मिळणार असल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police recruitment tuition classes for farmers' children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.