चोरीच्या मुद्देमाल तपासात पोलीस नापास

By admin | Published: June 17, 2015 01:57 AM2015-06-17T01:57:44+5:302015-06-17T01:57:44+5:30

पाच महिन्यात १.१४ कोटी लंपास ; केवळ १५ लाखांचा ऐवज हस्तगत.

Police refused to investigate theft | चोरीच्या मुद्देमाल तपासात पोलीस नापास

चोरीच्या मुद्देमाल तपासात पोलीस नापास

Next

संतोष वानखडे / वाशिम: कायदा-सुव्यवस्था राखण्यात मेरिटमध्ये असणारा वाशिम जिल्हा पोलीस विभाग चोरीच्या घटनांमधील मुद्देमाल हस्तगत करण्यात मात्र सपशेल ह्यनापासह्ण ठरला असल्याची साक्ष पोलीस विभागाचीच आकडेवारी देत आहे. जानेवारी ते मे २0१५ या कालावधीत जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या घटनांमधून एक कोटी १४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे तर पोलीस विभागाने यापैकी केवळ १५ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी गृह विभागाने पोलीस यंत्रणेच्या खांद्यावर सोपविली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात वाशिम पोलीस दलाची कामगिरी चमकदार आहे, यात कुणाचेही दुमत नाही; मात्र चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात काठावरचे यशही मिळू नये, ही लाजीरवाणी बाब आहे. चोरीला गेलेला मुद्दमाल आणि हस्तगत केलेल्या मुद्देमालाच्या आकडेवारीने पोलीस विभागाच्या कामगिरीची अक्षरश: चिरफाड केली आहे. जानेवारी ते मे २0१५ या पाच महिन्यात चोरट्यांनी जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ करीत १.१४ कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरोडा सहा, जबरी चोरी १३, घरफोडी ६७ तर चोरीच्या तब्बल १९0 घटना घडल्या आहेत. दरोड्याच्या सहाही घटना उघडकीस आणण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे; मात्र पाच लाख ९९ हजाराच्या ऐवजापैकी एक छदामही हस्तगत करता आला नाही.

Web Title: Police refused to investigate theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.