रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:51 PM2020-06-27T15:51:18+5:302020-06-27T15:51:27+5:30

रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील चिखली गावानजीक पकडला. 

Police seized a truck carrying 300 quintals of ration rice | रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला 

रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : अलिकडच्या काळात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. गत १० दिवसात मंगरूळपीर येथे तांदळाचे तीन ट्रक पोलिसांनी पकडल्यानंतर, २६ जूनच्या रात्रीदरम्यान रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील चिखली गावानजीक पकडला. 
रेशन दुकानातील तांदूळ एका १४ चाकी ट्रकमध्ये रिसोड येथून वाशिमच्या दिशेने जिल्हयाबाहेर बेकायदेशीर विकण्यास जात असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर सापळा रचला असता, २६ जून रोजी रात्रीदरम्यान चिखली गावानजीक संशयित ट्रक पकडण्यात आला. झाडाझडती घेतली असता, ट्रकमध्ये रेशनचे ३०० क्विंटल तांदूळ असल्याचे दिसून आले. यावेळी चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना दिसून आला नाही. सदर ट्रक ताब्यात घेऊन रिसोड पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला. अधिक चौकशी केली असता, सदर तांदूळ एका घरातून ट्रकमध्ये भरल्याचे चालकाने सांगितले. यानुसार रिसोड येथील एका खासाी घरात सलमान नावाच्या व्यक्तीने तो तांदुळ विनापरवाना साठवणुक केल्याचे आढळून आले तसेच तेथे असलेल्या गोडाऊनमधून धान्याचा काळाबाजार होत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. याप्रकरणी तहसिलशी पत्रव्यवहार केला असून, पुरवठा अधिकाºयांच्या तपासणीनंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड, ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी पार पाडली.

Web Title: Police seized a truck carrying 300 quintals of ration rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.