पोलिसांकडून २४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:47 AM2021-09-15T04:47:58+5:302021-09-15T04:47:58+5:30

------ जिल्ह्यात पोलिसांची संख्या अपुरी वाशिम : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूरसह अनसिंग, आसेगाव, धनज बु. येथील पोलीस ...

Police take action against 24 vehicles | पोलिसांकडून २४ वाहनांवर कारवाई

पोलिसांकडून २४ वाहनांवर कारवाई

googlenewsNext

------

जिल्ह्यात पोलिसांची संख्या अपुरी

वाशिम : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूरसह अनसिंग, आसेगाव, धनज बु. येथील पोलीस स्टेशनमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे. या ठिकाणी पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.

^^^^^^^^

हवामान यंत्र शोभेच्या वस्तू

वाशिम जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळांत सुमारे चार वर्षांपूर्वी हवामानाच्या माहितीसाठी स्वयंचलित हवामान यंत्र स्थापित करण्यात आले; परंतु हे यंत्र नादुरुस्त झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना या यंत्रांचा काही एक फायदा होत नसल्याचे दिसत असून, आता ही हवामान यंत्रे शोभेच्या वस्तूच ठरल्या आहेत.

----

ग्रामपंचायतींकडून नाल्यांची साफसफाई

वाशिम : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने गावात नाल्यांतील सांडपाण्यामुळे आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींकडून गत आठवडाभरापासून नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे.

^^^^

पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

वाशिम : तालुक्यातील धुमका, खंडाळा शिवारात पपईच्या झाडांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेऊन परिस्थिती गंभीर असल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी मंगळवारी केले.

^^^^^^^^^

Web Title: Police take action against 24 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.