वाशिम जिल्ह्यात बालकांना दिला पोलिओचा डोज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 05:51 PM2019-03-10T17:51:10+5:302019-03-10T17:51:28+5:30
वाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना १० मार्च रोजी जिल्ह्यातील केंद्रांवर पोलिओचा डोज देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना १० मार्च रोजी जिल्ह्यातील केंद्रांवर पोलिओचा डोज देण्यात आला.
जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सभापती सुधीर गोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोज देण्यासाठी गावनिहाय तसेच शहरनिहाय केंद्र देण्यात आले. सकाळी ८ वाजतापासून या मोहिमेला प्रारंभ झाला होता. सायंकाळपर्यंत जवळपास ७५ टक्क्यापेक्षा अधिक बालकांना पोलिओचा डोज देण्यात आला. बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच फिरते वाहन याद्वारेही बालकांना पोलिओचा डोज देण्यात आला.