पाच वर्षातील बालकांना पाजला पोलिओ डोज
By संतोष वानखडे | Published: March 3, 2024 01:42 PM2024-03-03T13:42:33+5:302024-03-03T13:43:02+5:30
Pulse Polio 2024: वाशिम जिल्ह्यात रविवार, ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जात असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
- संतोष वानखडे
वाशिम - जिल्ह्यात रविवार, ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जात असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हयात ० ते ५ वर्षाच्या वयोगटातील अपेक्षित लाभार्थीची संख्या ग्रामीण भागात ९१ हजार ६६५ व नागरी भागात ३६ हजार ६११ अशी एकुण १ लाख २८ हजार २९६ आहे. पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविणेकरीता २०८ आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले. जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिम उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात १०२२ बुथद्वारे बालकांना पोलिओ डोस दिला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुहास कोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे यांनी बालकाला पोलिओचा डोज पाजला.
वंचित बालकांना घरी जावून दिला जाणार डोज
३ मार्च रोजी पोलिओ डोजपासून वंचित राहिलेल्या शहरी भागातील पाच वर्षाआतील बालकांना ४ ते ९ मार्च दरम्यान तसेच ग्रामीण भागातील बालकांना ४ ते ६ मार्च या कालावधीत घरोघरी जावून पोलिओ डोज पाजण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.