भारिप बमसंचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 01:47 PM2017-07-28T13:47:08+5:302017-07-28T13:47:08+5:30
मेहकर : तालुका भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर
विविध मागण्यांसाठी २५ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी,
सर्व विकास महामंडळाचे कर्ज माफ झाले पाहिजे, सोयाबीनचे प्रति क्विंटल
२०० रुपये अनुदान देण्यात यावे. शासकीय जागेवर घरकुलाचा लाभ देण्यात
यावा, आदी मागण्यांचे निवेदन भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष वसंतराव
वानखेडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी वसंतराव वानखडे यांनी
मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ नेते पी.के.शेजोळ, मिलींद खंडारे, गोपाल
पाटील, दिलीप पगारे, अॅड.बबन वानखेडे, अॅड.एस.टी. कटारे, लोणार
तालुकाध्यक्ष संघपाल पनाड, आदीत्य घेवंदे, नितीन तायडे, माजी
जिल्हाध्यक्ष बि.के.इंगळे, शिवाजी जावळे, राजु गवई आदींनी विचार व्यक्त
केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आबाराव वाघ, भगवान अंभोरे,
भिमराव मोरे, रमेश मोरे, दामुअण्णा भराड, शेषराव अंभोरे, शालीकराम गवई,
समाधान वानखेडे, चंद्रकला मोरे, साधना इंगळे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन शहर अध्यक्ष नारायण इंगळे यांनी केले. तर आभारप्रदर्शन
सिद्धार्थ पंडीत यांनी केले. (शहर प्रतिनिधी)